लोणावळ्यातील निखिल कवीश्वर यांना मिळाली कोकण पदवीधर मतदार संघातील खास जबाबदारी.

0
64

LONAVLA NEWS : कोकण विभाग पदवीधर विधानसभा मतदार संघासाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार असल्याने. निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रमेश श्रीधर कीर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कीर यांनी पक्ष संघटनेच्या माध्यमातून कोकण विभागामध्ये चांगले काम केले आसल्याने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव काम केले आहे. त्यांच्या विजयासाठी या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून ९ लोणावळा शहरातील युवा नेतृत्व असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कवीश्वर यांच्यावर नवी मुंबईची सह समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निखिल कवीश्वर हे लोणावळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक असून पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध पदांवर कामे केली आहेत. तसेच कर्नाटक राज्य, महाराष्ट्र राज्य या ठिकाणी झालेल्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका, यामध्ये त्यांनी पक्ष संघटनेच्या माध्यमातून अनेक मतदारसंघांमध्ये व जिल्ह्यांमध्ये प्रभारी म्हणून देखील कार्यभार सांभाळला आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकण भागात देखील त्यांनी प्रभारी म्हणून काम केले असल्याने त्यांचा या सर्व भागांमध्ये मोठा जनसंपर्क आहे. याकरिताच पदवीधर मतदार विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यावर कोकण विभागातील उमेदवार कीर यांच्या प्रचारांमधील सह समन्वयक पदाची नवी मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here