माता रमाईचे अप्रकाशित साहित्य बार्टी प्रकाशित करणार : सुनील वारे

0
128

पुणे प्रतिनिधी : माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा संघर्ष त्यागमय असून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभे राहिल्या ,
रमाईच्या संघर्षमय आठवणी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी दिलेली खंबीरपणे साथ , त्यांचा पत्रव्यवहार, त्यांच्या जीवनावरील ऐतिहासिक घटनांचे संशोधन करून त्यांचे अप्रकाशित साहित्य बार्टी प्रकाशित करणार असे बार्टी संस्थेचे महासंचालक श्री सुनील वारे यांनी जाहीर केले .

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे दिनांक 27 मे 2024 रोजी त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर आणि देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस बार्टी संस्थेचे महासंचालक श्री सुनील वारे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी रमाईच्या त्यागावरच डॉ बाबासाहेब आंबेडकर या महासूर्याचं वादळ उभे राहिले ,असे प्रतिपादन केले.
रमाईच्या जिवनातील ऐतिहासिक घटनांचे अप्रकाशित साहित्य
प्रकाशन व प्रसिद्धी विभागामार्फत
प्रकाशित करणार आहेत यासाठी
रमाईच्या जिवनातील अनेक गोष्टींचे संशोधन करुन पुढील कार्य करण्यात येईल तसेच
बार्टीमार्फत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नियामक मंडळाच्या मान्यतेने
“भीमराव ते बाबासाहेब”
हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची वेब सिरिज लवकरच सुरू करणार असल्याचे सांगून त्यागमूर्ती रमाईस हा प्रकल्प अर्पण करत असल्याचे सांगितले.

ग्रंथपाल श्रीमती वैशाली खांडेकर यांनीही रमाईच्या स्मृतीना उजाळा दिला.

यावेळी निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, विभागप्रमुख श्रीमती स्नेहल भोसले, अनिल कारंडे, संजय कदम यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नेस वाडिया कॉलेज समोरील महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथील रमाईच्या पुतळ्यास मा महासंचालक श्री सुनिल वारे, विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

माता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने निमंत्रक विठलदादा गायकवाड यांनी श्री वारे, डॉ चव्हाण यांना शांतीचे प्रतीक पंचशीलेची शाल, सन्मान चिन्ह , रमाईचे जीवन चरित्र भेट देऊन सन्मानित केले.
यावेळी मा महासंचालक, मा विभागप्रमुख यांनी विठ्ठलराव गायकवाड व मान्यवरांसमवेत रमाईच्या संघर्षमय जीवनातील पैलुवर चर्चा केली.

याप्रसंगी आर के लोढे, बार्टीचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक विकास गायकवाड, रामदास लोखंडे, आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here