मावळ विधानसभा मतदार संघात रविंद्र आप्पा भेगडे यांच्या नेतृत्वात भाजपचे गाव चलो अभियान सुरू – मा.माऊली मामा शिंदे

0
226

फिर एक बार मोदी सरकारचा नारा- मावळ लोकसभेचा खासदार भारतीय जनता पार्टीचे मतदारच ठरवणार – रविंद्र आप्पा भेगडे

आज मावळ विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियानाची सुरवात झाली असून जवळपास १५० प्रवासी कार्यकर्ते ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत मावळ विधानसभा मतदार संघातील ३८१ बूथ वर प्रवास करून मोदी सरकार व महायुती सरकारने राबविलेल्या विविध जनकल्याण
कारी योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत घेऊन जाणार असून याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करण्याचे कार्य या गाव चलो अभियानात केले जाणार असल्याची माहिती मा.अध्यक्ष माऊली मामा शिंदे व मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांनी दिली.

त्याच प्रमाणे प्रत्येक बूथ वर संघटनात्मक बांधणी देखील पूर्ण करण्याचे काम या गाव चलो अभियानात केले जाणार असून फिर एक बार मोदी सरकारचा नारा यानिमित्ताने मावळ भाजपने दिला आहे. यामध्ये दिवार लेखन, बूथ कमिटी, बूथ कार्य समिती, बूथ स्तरावरील व्हॉटसअप ग्रुप ई. संघटनात्मक कार्य बूथ स्तरावर पूर्ण केली जाणार आहेत.

तसेच मावळ लोकसभेत भारतीय जनता पार्टीने कायम युती धर्माचे पालन करून जो उमेद्वार पक्षाने दिलेला आहे त्या उमेदवारास प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे कार्य कायमच भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनी केलेले आहे.

यावेळीची राजकीय गणितं जरी बदललेली असली तरी मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुती जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याचे कार्य भारतीय जनता पार्टी व महायुतीचे मतदार करणार आहेत त्यामुळे कोणीही पोकळ वल्गना करून मावळ लोकसभेवर दावा करण्याचे कार्य करू नये असे मत या गाव चलो अभियानाच्या दरम्यान रविंद्र भेगडे यांनी केले आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते माजी सभापती राजाराम मामा शिंदे शंकर नाना शिंदे मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस अभिमन्यूभाऊ शिंदे , कामशेत शहर भाजपा अध्यक्ष विजय भाऊ शिंदे , कामशेत शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण भाऊ शिंदे , माजी सरपंच आनंदा भाऊ येवले, मा.सरपंच सौ.सारिकाताई घोलप, सौ. सारिकाताई शिंदे, जेष्ठ नेते बाळकृष्णभाऊ मोकाशी, भारतीय जनता पार्टी युवा वॉरियर्स अध्यक्ष प्रणेश भाऊ नेवाळे , युवा नेते मल्हारी भाऊ गायकवाड, ग्रामपंचायतच्या सदस्या सौ.कविताताई शिंदे, सौ. रोहिणीताई दौंडे, पुणे जिल्हा सोशल मीडिया संयोजक विकास भाऊ घारे, कामशेत शहर सोशल मीडिया अध्यक्ष मानस भाऊ गुरव, कामशेत शहर युवा वॉरियर्स अध्यक्ष सुहासभाऊ लोणकर, युवा नेते माऊली भाऊ येवले, गौरव भाऊ गाडेकर , नवनाथ भाऊ गायकवाड , स्वामी भाऊ शिंदे ,आदी प्रमुख उपस्थित होते.!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here