मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे- रविंद्र भेगडे

0
58

आज तळेगाव दाभाडे येथे भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा स्तरावरील प्रवासी कार्यकर्ता कार्यशाळा जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बुट्टे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी मागील दहा वर्षांमध्ये राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसार गावागावात शेवटच्या घटकापर्यंत माहिती व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभेच्या वतीने गाव चलो अभियान राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत प्रवासी कार्यकर्ता पुढील १० दिवस प्रत्येक बूथ वर प्रवास करून जोमाने कार्य करणार आहे.

बूथ स्तरावरील सर्व संघटनात्मक कार्य येणाऱ्या दहा दिवसात सर्व प्रवासी कार्यकर्त्यांनी पूर्ण करून मोदी साहेबांच्या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करून बूथ वर भारतीय जनता पार्टीला ५१% पेक्षा जास्त मतदान घेण्यासाठी सर्व प्रवसी कार्यकर्त्यांनी गाव चलो अभियान यशस्वी करून मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बुट्टे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू असून मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपला भारत देश विश्र्वगुरू म्हणून जगाच्या पटलावर सिद्ध होत असून या ऐतिहासिक कार्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी जोमाने कार्याला लागण्याच्या सूचना मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांनी दिल्या.

या कार्यशाळेत कोंडीवडे अमा ग्रामपंचायत चे उपसरपंच मा.अरुण भाऊ तळावडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला त्याबद्दल जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बुट्टे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी मा.तालुकाध्यक्ष मा.दत्ताभाऊ गुंड,जेष्ठ नेते मा.निवृत्ती भाऊ शेटे, मा.एकनाथरावजी टिळे, मा.श्रीधरजी पुजारी, जेष्ठ नेते मा.प्रशांत आण्णा ढोरे,मा.रविंद्र नाना दाभाडे, मा.शिवाजी आबा टाकवे, मा.अरुण भाऊ भेगडे पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ.ताराचंदजी कराळे, मा.संजयजी रौंधळ, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा.बाळासाहेब घोटकुले,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा.संदीप भाऊ सातव,
तालुका उपाध्यक्ष मा.राजू भाऊ मुर्हे , मा.एकनाथ भाऊ पोटफोडे, तालुका सरचिटणीस मा.अभिमान्यू भाऊ शिंदे, मा.अविनाश भाऊ गराडे, मा.सचिन भाऊ येवले, मा.रोहिदास भाऊ असवले, तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष मा.अशोक भाऊ दाभाडे, लोणावळा शहराध्यक्ष मा.अरुण भाऊ लाड, देहूरोड शहराध्यक्ष मा.लहू मामा शेलार , प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.जितू भाऊ बोत्रे,युवा मोर्चा अध्यक्ष मा.नितीन भाऊ मराठे, महिला आघाडी अध्यक्षा सौ. सायली ताई बोत्रे ,वडगाव शहराध्यक्ष मा.अनंता भाऊ कुडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष मा.अभिजीत भाऊ नाटक, किसान मोर्चा अध्यक्ष मा.सूर्यकांत भाऊ सोरटे, सहकार आघाडी अध्यक्ष मा.ज्ञानेश्वर भाऊ आडकर, ओबीसी आघाडी अध्यक्ष मा.शरद भाऊ साळुंखे, कामगार आघाडी अध्यक्ष मा.दत्ताभाऊ खेंगले, युवा वॉरियर्स अध्यक्ष मा. प्रणेश भाऊ नेवाळे यांच्यासह सर्व सुपर वॉरियर्स, सर्व प्रवासी कार्यकर्ते, सर्व ग्राम संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here