22 जानेवारी 2024 रोजी मावळ तालुक्यातील सर्व मांस व मध्य विक्री केंद्र बंद ठेवावे – रविंद्र भेगडे, यांची तहसीलदार साहेबांकडे मागणी

0
154

Maval- २२ जानेवारी २०२४ रोजी आयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा होत असून तब्बल ५०० वर्षानंतर प्रभू श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्ताने सबंध देशामध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे.

प्रभू श्री राम हे हिंदू धर्माचे श्रध्दास्थान आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सबंध देशभरामध्ये दिवाळी साजरी केली जाणार असून मावळ तालुक्यात देखील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने सर्व समाज बांधवांमध्ये शांतता, एकोपा व सामाजिक संदेश जावा यासाठी आपण मावळ तालुक्यातील सर्व मांस विक्री केंद्र बंद ठेऊन समस्त हिंदू बांधवांच्या भावनेचा आदर करावा अशी मागणी आज मावळ भाजपा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख साहेब यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड उपस्थित होते.!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here