मलवळी येथील संपर्क लिली इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनियर कॉलेज चा वार्षिक क्रीडा दिन मोठ्या उत्साहा त साजरा करण्यात आला

0
82

Maval- संपर्क संस्थेतील मलवली केंद्रातील लिली इंग्लिश मिडीयम स्कुल चा वार्षिक क्रीडा दिन विद्यार्थ्यांच्या विविध कवयतीने संपन्न झाला

काही दिवसांपूर्वी आसपासच्या ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी माध्यमात शिकता यावे या उद्देशाने संपर्क चे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांनी ही शाळा सुरु केली काही दिवसात शाळा नावारूपास आली असून मलवली केंद्रातील शाळेत मुलांसाठी वैवीध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात..
शाळेचा वार्षिक क्रीडा दिन नुकताच संपर्क मलवली केंद्राच्या मैदानात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून इंदिरा महाविद्यालयच्या प्राचार्य हीना गांधी उपस्तिथ होत्या
व्यासपीठावर संपर्क चे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी , सल्लागार नवनिता चटर्जी, कृष्णा सातार्डेकर तसेंच लिली इंग्लिश स्कुल चे प्राचार्य चेतन देशमुख क्रीडा शिक्षक कृष्णा अहिर उपस्तिथ होते चेतन देशमुख यांनी शाळेच्या वतीने प्रमुख पाहून्याचा शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सन्मान केला.
प्रमुख पाहुण्याच्या हस्ते क्रीडा मशाल पेटवून क्रीडा दिनाला सुरुवात करण्यात आली
लिली इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थ्याने कवायंती द्वारे पाहुण्यांना मानवंदना दिली
संपर्क चे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांनी प्रास्ताविकात शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या गवळी हिने केले
कार्यक्रमाला पालक वर्ग, शिक्षक, शिक्षेकतर कर्मचारी
संपर्क संस्थेतील अधिकारी वर्ग उपस्तिथ होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here