लष्करी प्रशिक्षणास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद…

0
231

कान्हे : ग्रामीण भागातील मुले व मुलींमध्ये धाडसी वृत्ती वाढीस लागावी, या हेतूने रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे व कमांड स्पेशल फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर दादासाहेब सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याना लष्करी प्रशिक्षण देण्यात आले.


15 डिसेंबर ते 18 डिसेंबर या चार दिवसीय विशेष बेसिक लष्करी प्रशिक्षणात 165 विद्यार्थ्याना रायफल शूटिंग,धनुष्यबाण, लाठी – काठी, अग्निपरीक्षा, परेड, मनोरे, साहसी खेळ, रोप कलायंबिंग याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाची सांगता रोटरी क्लब ऑफ निगडी प्रेसिडेंट हरबिंदरसिंग दुल्लत, जयंत येवले युथ डायरेक्टर, कमलजीत कौर फर्स्ट लेडी रोटरी क्लब ऑफ निगडी, रोटरियन सुनिल सुरी, कान्हे सरपंच विजय सातकर, जि. प. शालेय शिक्षण समिती अध्यक्ष समीर सातकर, प्रभारी मुख्याध्यापिका सविता चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी चांगला सराव करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना ट्रॉफी,मेडल व प्रशस्ती पत्रके देऊन सर्व विद्यार्थ्याचा सन्मान प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला. या प्रशिक्षणाचे नियोजन रियाज तांबोळी, राम कदमबांडे, सोमनाथ साळुंके, लक्ष्मण सातकर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here