भारतीय जनता पार्टी मावळ तालुका गाव भेट दौरा..!

0
339

गाव भेट दौऱ्या दरम्यान रवींद्र भेगडे गावातील समस्या जाणून घेत असताना

भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र आप्पा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली मावळ भाजपच्या गाव भेट दौऱ्यास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गावोगावी जल्लोषात स्वागत

वडगाव मावळ – भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याची मागील १५ दिवसांपूर्वी नवीन कार्यकारणी जाहीर झाली असून या सर्व नवीन कार्यकारणी ला सोबत घेऊन तालुक्याचे अध्यक्ष दत्तात्रय गुंड यांनी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांच्या नेतृत्वात व मा.राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ भेगडे, प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र कोंडेश्वर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन गाव भेट दौरा सुरू केला आहे.

यामध्ये आज जांभवली, थोरण, शिरदे , सोमवडी, भाजगाव, कोळवाडी , वळवंती , पाले आणि उकसान आदी गावांमध्ये आज गावभेट दौरा पूर्ण झाला असून गावोगावी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे व जल्लोषात या गाव भेट दौऱ्याचे स्वागत केले असून यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये अंनादाचे व उत्साहाचे नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गावभेट दौऱ्यामध्ये प्रत्येक बूथ स्तरावरील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद करून तेथील संघटनात्मक नियुक्त्या, बूथ सशक्तीकरण अभियान, विकसित भारत संकल्प यात्रा, मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारने राबविलेल्या धोरणात्मक जनकल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा आदी बाबींवर कार्यकर्त्यांशी मोकळा संवाद या दौऱ्याच्या माध्यमातून होत आहे.

यावेळी रविंद्र भेगडे यांनी बोलतांना सांगितले की स्थानिक पातळीवर काम करत असताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या छोट्या मोठ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा होता,आहे व येणाऱ्या काळात देखील राहील व येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी साहेबांना पंतप्रधान आणि फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा आपल्या बुथवर गावात जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा व ज्यांना कोणाला आणखी योजनांचा लाभ मिळालेला नसेल तो लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचा जो उमेदवार असेल तो विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागण्याचे आदेश या निमित्ताने गावातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले.

यावेळी भारतीय जनता पार्टी मावळ तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ गुंड यांच्यासह सर्व सर्व मोर्चा आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here