भाजपा मावळ विधानसभा व विद्यार्थी आघाडी युवा वॉरियर्स आयोजित मतदार नोंदणी अभियानास व्ही.पी.एस. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्पुर्त प्रतिसाद – रविंद्र भेगडे

0
43

Maval- आज भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा व विद्यार्थी आघाडी युवा वॉरियर्स यांच्या वतीने व्ही.पी.एस. महाविद्यालय लोणावळा येथे मावळ मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले या अभियानास व्ही.पी.एस. महाविद्यालयातील विद्यार्थी व लोणावळा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदार नोंदणी करून घेतली.

यावेळी महाविद्यायातील विद्यार्थ्यांनी या मतदार नोंदणी अभियानामध्ये नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे आभार मानून २०२४ मध्ये मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार या अभियानाच्या माध्यमातून मिळणार असल्याचे मत व्यक्त केले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, मा.नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव,प्राचार्य यु.ए.महेंद्रकर सर, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण भाऊ लाड, तालुका सरचिटणीस सचिन भाऊ येवले , लोणावळा शहर भाजपा सरचिटणीस शुभम भाऊ मानकामे, लोणावळा शहर भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष विजयाताई वाळुंज,हर्षल भाऊ होगले, भाजपा मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजीत भाऊ नाटक, भाजपा मावळ तालुका युवा वॉरियर्स अध्यक्ष प्रणेश भाऊ नेवाळे,लोणावळा शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश भाऊ पालेकर , अश्विनीताई जगदाळे, भगवतीताई वाळुंज, मुक्ताताई गव्हाणे, पद्माताई संपत, लोणावळा शहर भाजपा युवा वॉरियर्स अध्यक्ष कृष्णा भाऊ शर्मा यांच्यासह लोणावळा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या महिला भगिनी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here