वाय सी क्लासेसच्या वतीने लोणावळ्यात भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन

0
134

लोणावळा :- वाय सी क्लासेसच्या वतीने लोणावळ्यात भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले,यात ३०० पेक्षा जास्त खेळाडूचा सहभाग आणि विशेष म्हणजे मुलींचा सहभाग जास्त होता,राज्यातील बहुतेक हा पहिला खाजगी क्लास असेल की जो भारतीय सैन्य दला मध्ये ३० वर्ष सेवा केलेले सुभेदार कैलास येवले यांची नियुक्ती करून युवकांना देणार स्वयं शिस्तिचे धडे,सशक्त युवक, सशक्त भारत”मानून सरकारी नोकर भरतीसही लागणा-या मैदानावरील चाचणीसाठी संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहें.त्याप्रमाणे वर्षभर त्याच क्षेत्रात विविध पदावर काम करणान्या मान्यवरांच मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.

लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे अनुभव यावेळी सांगितले. तर माजी नागराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,सामाजिक कार्यकर्ते नासिर भाई शेख एम एन न्युजचे मुख्य संपादक ऍड संजय पाटील,सुभाष डेनकर, कैलास येवले आणि शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here