बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाविरोधात भाजपा देहूरोड मंडळच्या वतीने झारखंडच्या खासदार धीरज साहू याच्या पुतळ्याचे दहन

0
95

देहूरोड प्रतिनिधी-किशोर आडसुळ

झारखंड येथील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या बेहिशबी मालमत्तेच्या विरोधात (सोमवार) दि .११ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टी देहूरोड मंडळच्या वतीने प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निदर्शने करण्यात आली.

भारतीय जनता पार्टी देहूरोड शहराध्यक्ष रवींद्र उर्फ लहूमामा शेलार यांच्या नेतृत्वाखाली देहूरोड शहरातील ऐतिहासिक सुभाषचंद्र बोस चौकात आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत त्याचे दहन करण्यात आले

झारखंडचे काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे तिनशे कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आढळून आली आहे. ही मालमत्ता गोरगरिब जनतेला लुटूनच गोळा केली आहे. सामान्य लोकांच्या खिशातले पैसे लुटणाऱ्या भ्रष्ट धीरज साहूचा आम्ही निषेध करीत आहोत.असे शहराध्यक्ष रवींद्र उर्फ लहूमामा शेलार यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी आंदोलनात शहराध्यक्ष रविंद्र उर्फ लहुमामा शेलार,जेष्ठ नेते दिलीप नायर,उमाशंकर सिंह,कैलास राऊत,सूर्यकांत सुर्वे,अमोल नाईकनवरे, रामू विरण,अनिल खंडेलवाल, रमेश रेड्डी, अनिल दाभाडे,हनिफ शेख,रोहन गायकवाड, राजू ओसवाल, नंदू गुराल,अजय आडसुळ, महिला अध्यक्षा सारिका मुथा, मा.कॅन्टो.बोर्ड उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे, जेष्ठ नेत्या लिलावती भारद्वाज,सविता पिंजण,शकुंतला आगरवाल आदी सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here