विकसित भारत संकल्प यात्रा भाजपा मावळ विधानसभा..!

0
167

Maval- मावळ विधानसभा मतदार संघातील शिवणे या गावी आज विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करून प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना कार्ड चे वाटप केले..!

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात मोदी सरकारने मागील ९ वर्षात राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची यशस्वी अमलबजावणी झाली असून देशातील लाखो गोर, गरीब , शेतकरी , शेतमजूर महिला , विद्यार्थी व नागरिकांना मोदी सरकारच्या योजनांचा थेट लाभ मिळाला आहे.

अशा योजनांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार होऊन ज्या नागरिकांना अजून लाभ घेता आला नाही अशा नागरिकांना या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लाभ देऊन आपला देश विकसित भारत करण्याचे कार्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात सबंध देशभर सुरू आहे !

ही विकसित भारत सकल्प यात्रा मावळ विधानसभा मतदार संघातील जवळपास ८९ गावामध्ये जाणार असून तालुक्यातील नागरिकांनी या संकल्प यात्रेचे स्वागत करून मोदी साहेबांच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती गावातील सर्व नागरिकांना देऊन याचा लाभ घेण्याचे आवाहन मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांनी केले आहे..!

यावेळी गट विकास अधिकारी सुधीरजी भागवत साहेब, भाजपा ज्येष्ठ नेते विठ्ठल दादा घारे ,भाजपा तालुका सरचिटणीस अविनाश भाऊ गराडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष एकनाथ भाऊ पोटफोडे,धनंजय भाऊ टिळे,गावचे सरपंच महेंद्र भाऊ वाळुंज , उपसरपंच कविताताई शेटे यांच्यासह गावचे ग्रामसेवक साहेब, अशा सेविका, अंगणवाडी ताई, बचत गटातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here