लहुजी शक्ती सेना पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या वतीने मावळ लोकसभेचे खासदार मा. श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांना आंदोलना संदर्भात निवेदन…….

0
282

देहूरोड (प्रतिनिधी)

लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष,मातंग हृदय सम्राट,आदरणीय श्री.विष्णू भाऊ कसबे व प्रभारी प्रदेशाध्यक्ष लहूश्री. कैलास दादा खंदारे साहेब यांच्या नेतृत्वात पुणे ते नागपूर आरक्षण क्रांती पदयात्रा चालू असून पुणे जिल्हाध्यक्ष तथा लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सचिव श्री.दत्ताभाऊ जगताप व पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय सकट यांच्या मार्गदर्शनातून यासंदर्भात लोकसभेमध्ये मातंग समाजाचे प्रश्न मांडून यावर तात्काळ, जलद हालचाली करुन मागण्या मान्य करण्यासाठी लोकसभेत प्रयत्न करावेत,असे निवेदन मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री.श्रीरंग आप्पा बारणे यांना लहुजी शक्ती सेनेच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणीच्या वतीने देण्यात आले असून यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष लहू राम अडसूळ, कोअर कमिटी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण,शहर उपाध्यक्ष मधुकर तोरड,शहर युवक अध्यक्ष अक्षय पौळ,पिंपरी विधानसभा अध्यक्ष ओमकार गायकवाड,उपाध्यक्ष गोविंद रावत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here