लहुजी शक्ती सेनेची पुणे ते नागपूर पायी 5 वी आरक्षन क्रांती पदयात्रा…

0
139

पुणे : महाराष्ट्र भरामध्ये मराठा,ओबीसी आदिवासी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन महाराष्ट्र भरामध्ये आंदोलने व अनेक अशा गोष्टी सुरू असताना महाराष्टातील मातंग समाज देखील त्यांच्या मागण्या घेऊन आता सरकार दरबारी धडकणार आहे.

आरक्षण क्रांती पदयात्रा येत्या 16 नोव्हेंबर ला सकाळी 11 वाजता लहुजी तालीम गंज पेठ पुणे येथून निघणार आहे महाराष्ट्र भरातील मातंग समाज बांधव हे पुणे ते नागपूर अशी आरक्षण क्रांती पदयात्रा करणार आहेत यंदाची पदयात्रा ही पाचवी पदयात्रा आसुंन मातंग समाजाच्या अनेक मागण्या साठी यात्रा काढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच 13 डिसेंबर यशवंत स्टेडियम नागपूर येथे यात्रेची सांगता होणार असून.

मातंग समाजासाठी सतत टोकाची भूमिका घेणारी लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व लहुजी विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पार पडणार असून पिंपरी चिंचवड,मावळ मधून मोठ्या संखेने मातंग समाज आरक्षण यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती लहुजी शक्ती सेना पिंपरी चिंचवड अध्यक्ष लहू अडसूळ यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here