देहूरोड भाजपा च्या वतीने शाळकरी मुलांना दिवाळी फराळाचे वाटप.

0
141

देहूरोड प्रतिनिधी : दिनांक.०७/११/२०२३ रोजी भारतीय जनता पार्टी देहुरोड शहर अध्यक्ष श्री.रविंद्र उर्फ लहुमामा सहादू शेलार यांच्या संकल्पनेतून व राज्याचे मा.राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महात्मा फुले प्राथमिक शाळा मामुर्डी ,महात्मा गांधी प्राथमिक शाळा एम.बी.कॅम्प, कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळा चिंचोली, पुज्य साने गुरुजी प्राथमिक शाळा किन्हई मधील सर्व विध्यार्थी तसेच देहुरोड शहरातील सर्व सफाई कर्मचारी,घंटागाडी कर्मचारी व सर्व कार्यकर्त्यांना दिवाळीनिमित्त सर्वाना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला आहे.
मावळ विधानसभा प्रमुख श्री.रविंद्र (आप्पा) भेगडे, प्रशासक देहुरोड ॲड.कैलास पानसरे, भाजप शहराध्यक्ष मा.रविंद्र उर्फ लहुमामा शेलार, भाजपा जेष्ठ नेते गुरुमितसिंग रत्तू, मा.कॅन्टो.बोर्ड उपाध्यक्ष सौ.सारिका नाईकनवरे ,राहुल बालघरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला.

सुत्रसंचालन उपाध्यक्ष सुर्यकांत सुर्वे व आभार सरचिटणीस तुकाराम जाधव यांनी व्यक्त केले.यावेळी मा.महिला अध्यक्षा सारिका मुथा, अमोल नाईकनवरे, रमेश रेड्डी, रामु विरण, राजु ओसवाल, अनिल दाभाडे, लिलावती भारद्वाज,सुनिता शिंदे,सविता पिंजण,बबन पिंजण,धीरज नायडू,कैलास राऊत, धर्मेंद्र प्रसाद नंदू गुराल,राजु भालदार,युवा अध्यक्ष रोहन गायकवाड व स्थानिक महिला ग्रामस्थ सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद सफाई कर्मचारी असंघटीत कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here