लहुजी शक्ती सेना पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर……पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी श्री.लहू राम अडसूळ

0
223

पिंपरी चिंचवड प्रतिनिधि:

पिंपरी चिंचवड शहरातील लहुजी शक्ती सेनेच्या नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली दी 05 रोजी ही कार्यकारणी खडकी या ठिकाणी जाहिर झाली तसेच कार्यकारणी मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आल्या.

यामध्ये लहुजी शक्ती सेना पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी श्री.लहू राम अडसूळ, पिंपरी चिंचवड शहर कोअर कमिटी अध्यक्ष पदावर श्री.ज्ञानेश्वर भाऊ चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून फादर बॉडी महिलाध्यक्षा सौ.शिलाताई संतोष गायकवाड, महिला आघाडी भोसरी शहराध्यक्षा सौ. मालन ताई पारधे यांच्यासह शहर उपाध्यक्षपदी श्री.मधुकर भाऊ तोरड, देहूरोड शहराध्यक्ष पदी श्री.बाळूभाऊ कुचेकर, देहूरोड शहर उपाध्यक्षपदी श्री.नागेश भाऊ कसबे, पिंपरी चिंचवड युवक अध्यक्षपदी श्री.अक्षय भाऊ पौळ,कमिटी शहर संघटक पदी श्री.रमाकांत भाऊ गायकवाड,कमिटी शहर कार्याध्यक्ष पदी श्री. दिगंबर भाऊ सोनोने, कमिटी उपकार्याध्यक्ष पदी श्री.अनिल भाऊ पवार,पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी श्री.ओमकार भाऊ गायकवाड पिंपरी विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष पदी श्री. सनी भाऊ रसाळ पिंपरी विधानसभा सोशल मीडिया उपाध्यक्षपदी कु.शुभम भाऊ खुडे, कोअर कमिटी सल्लागारपदी श्री.दादाभाऊ तोरड, युवक कार्यध्यक्ष पदी श्री.शिवाजीभाऊ खडसे, युवक सचिव पदी श्री.ऋषिकेश भाऊ वाघमारे, युवक उपकार्यध्यक्ष पदी श्री.महादेव भाऊ पौळ,विठ्ठलनगर वार्डाध्यक्षा महिला आघाडी पदी सौ. आशाताई फाळके, सौ. छायाताई शिंदे भोसरी शहर उपाध्यक्ष महिला आघाडीपदी तसेच श्री.अरुण भाऊ चव्हाण विठ्ठलनगर,नेहरूनगर विभाग अध्यक्ष श्री.राजूभाऊ पाटोळे दत्तनगर वार्डाध्यक्ष अश्या प्रकारे विविध पदांवर नियुक्ती करून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मानपत्र,शाल, श्रीफळ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ जगताप साहेब, कोअर कमिटी पुणे जिल्हाध्यक्ष श्री.नागेश भाऊ शेलार साहेब, पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री .विजय भाऊ सकट, पुणे जिल्हा सरचिटणीस श्री. आकाश भाऊ मात्रे,सामाजिक कार्यकर्ते श्री.गणेश भाऊ गायकवाड, कु.आशिष भाऊ खोत, श्री.शिवाजी भाऊ चव्हाण,श्री.अविनाश भाऊ गायकवाड, श्री. अक्षय भाऊ शिंदे यांसह पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील इतर मान्यवर,संघटनाप्रेमी, पदाधिकारी,कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.

लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक, अध्यक्ष मा.श्री. मातंग हृदयसम्राट, आदरणीय श्री .विष्णू भाऊ कसबे साहेब, संघटनेचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष आदरणीय, लहूश्री. कैलास दादा खंदारे साहेब यांच्या आदेशान्वये तसेच पुणे जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त महाराष्ट्र राज्य सचिव लहूश्री, श्री.दत्ताभाऊ जगताप साहेब,पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.लहूश्री.विजय भाऊ सकट साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून लहुजी शक्ती सेना पिंपरी चिंचवड शहरावरील कार्यकारिणी जाहिर करण्यात आली


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here