मराठा आरक्षणासाठी कार्ला येथे सकल मराठा समाजाने काढले गाढव मोर्चा आंदोलन

0
121

लोणावळा शहर व ग्रामीण सकल मराठा समाजाने काढले आगळे वेगळे आंदोलन
कार्ला- मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांंच्या पाठींब्यासाठी कार्ला फाटा येथे चार जणांचे आमरण उपोषण व चक्री उपोषण सुरु असून व केंद्र व राज्य सरकार कडून कुठल्याही प्रकारचा आरक्षणाबाबत निर्णय होत नसल्याने आज लोणावळा शहर व ग्रामीण सकल मराठा समाजाच्या वतिने केंद्र सरकार व राज्यसरकार तसेच लोकसभेत व विधानसभेत असणा-या मराठा खासदार व आमदार यांंच्या विरोधात प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला.

यावेळी कार्ला शिवशंकर मंदिरापासून हा गाढव मोर्चा सुरु करुन ज्या ठिकाणी उपोषण सुरु आहे तेथे तो नेण्यात आला.
ह्या मोर्चा मध्ये सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत परिसर दूमदुमून गेला होता.
यावेळी लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील सकल मराठा समाजाचे सदस्य आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here