मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या पुन्हा ब्लॉक घेतला जाणार

0
119

पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 दरम्यान दोन तासांचा हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या दरम्यान पुण्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येईल. आयटीएमएस अंतर्गत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. यावेळी सोमटने फाटा जवळ ही गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून असे ब्लॉक घेतले जात आहे. तसेच पुढील काही महिने असेच ब्लॉक घेतले जाणार आहेत. ब्लॉकवेळी सर्व वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या दरम्यान ब्लॉक दरम्यान प्रवाश्यांनी सहकार्य कराव असे आवाहन एमएसआरडिसी आणि महामार्ग पोलिसांनी केलेलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here