तळेगाव आगारातून एसटीबस सेवा बंद

0
188

तळेगाव दाभाडे येथून बीड कडे जाणारी एसटीबस सेवा सध्या बंद करण्यात आलेली आहे.मनोज जरांगे- पाटील यांनी हाती घेतलेले मराठा आरक्षण मिळण्यासाठी साठी आमरण उपोषण आंदोलनाची धग दिवसेंदिवस तीव्र होत असल्यामुळे तळेगाव दाभाडे एसटी आगारातून सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीड आणि पाथर्डी कडे जाणाऱ्या आणि पाथर्डी एसटीबस बंद करण्यात आल्या आहेत.

पाथर्डीकडे सोडण्यात येणाऱ्या एसटी बस बंद करण्यात आल्या आहेत १-२दिवसात आणखी काही एसटी बससेवा बंद करावी लागण्याची शक्यता आहे.अशी माहिती तळेगाव दाभाडे आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी पुढारीशी बोलताना दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here